देवळा: उमराणेजवळ महामार्गावरून मालेगावकडे जाणारी मुरबाड आगाराची बस (एमएच १४, एमएच ०४८३) बुधवारी (ता. १३) दुपारी एकच्या सुमारास रस्त्याच्या कडेला झाडावर जाऊन आदळली आणि नालीमध्ये जाऊन कलंडली. यात सात प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असून, २८ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी मालेगावला हलविण्यात आले आहे.