Nashik Crime News : मोठ्या भावाच्या शिवीगाळीचा लहानगा बळी; आधारतीर्थ आश्रमातील खुनाची अखेर उकल

Alok Shingare
Alok Shingareesakal

नाशिक : आश्रमात मुले खेळत असताना त्यातून वाद झाला आणि शिंगारे बंधूंनी संशयित अल्पवयीन मुलास शिवीगाळ केली. या किरकोळ कारणावरून साडेतेरावर्षीय संशयित मुलाने साडेतीनवर्षीय आलोकचा गळा आवळून खून केल्याचे पोलिस तपासातून निष्पन्न झाले आहे. मंगळवारी (ता. २२) सकाळी आलोक आश्रमातील त्याच्या खोलीच्या बाहेर मृतावस्थेत आढळून आला होता. अखेर तीन दिवसांनी या खुनाच्या घटनेची उकल करण्यात पोलिसांना यश आले. (murder in Adhartirth Ashram near trimbakeshwar finally solved Latest Nashik Crime News)

नाशिक-त्र्यंबकेश्‍वर रोडवरील आधारतीर्थ आश्रमात मंगळवारी सकाळी साडेसहा-सातच्या सुमारास साडेतीनवर्षीय आलोक विशाल शिंगारे संशयास्पदरीत्या मृतावस्थेत आढळून आला होता. शवविच्छेदनातून आलोक याचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणी त्र्यंबकेश्‍वर पोलिसांत अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच अधीक्षक शहाजी उमाप, अप्पर अधीक्षक माधुरी कांगणे, त्र्यंबकेश्‍वरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप रणदिवे यांनी घटनास्थळी धाव घेतली. आश्रमातील लहान मुलांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण होते.

परंतु, खुनाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी अत्यंत संयम आणि संवेदनशील पद्धतीने तपास करावा लागला. यासाठी त्याचे कौशल्यपणाला लागले. मुलांमध्ये चुकीचा मेसेज जाऊन नये याची पोलिस यंत्रणेने दक्षता घेत बालकल्याण समितीसमोर संशयितास आणले. या वेळी संशयिताने घटनेची माहिती दिली. आलोक आणि त्याचा मोठा भाऊ आयुष हे दोघे आश्रमात राहतात.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

Alok Shingare
Labor Election : मजूर फेडरेशनसाठी तिरंगी, बहुरंगी लढती; 7 तालुका प्रतिनिधी बिनविरोध

घटनेपूर्वी संशयित साडेतेरावर्षीय अल्पवयीन मुलाशी शिंगारे बंधूंचा वाद झाला. त्यातून शिंगारे बंधूंनी त्यास शिवीगाळ केली. त्याचा राग डोक्यात धरून संशयित अल्पवयीन मुलाने सोमवारी (ता. २१) मध्यरात्री झोपेत असलेल्या आलोक यास खोलीबाहेर नेले आणि साडीच्या सहाय्याने त्याचा गळा आवळून खून केला. या प्रकरणी त्र्यंबक पोलिसांनी अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले आहे.

एकाच परिसरातील रहिवासी

संशयित व शिंगारे बंधू हे उल्हासनगरातील एका परिसरातील रहिवासी आहेत. शिंगारे कुटुंबीयांची झालेली ओढाताण पाहत संशयिताच्या आजीने आधारतीर्थाची माहिती शिंगारे बंधूंच्या आईला दिली होती. त्यानंतर शिंगारे बंधू आधारतीर्थमध्ये शिक्षणासाठी दाखल झाले होते.

Alok Shingare
Nashik News : फर्निचर घोटाळयाचा अहवाल दडपला?; समितीने दिला होता 62 कोटींच्या तफावतीचा अहवाल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com