
Jalgaon News : ‘अलबत्या गलबत्या’ नाटक जळगावात
जळगाव : एस. डी. इव्हेंट्सच्या दशकपूर्तीनिमित्त रविवारी (ता. २९) मराठी रंगभूमीवरील विश्वविक्रमी ‘अलबत्या गलबत्या’ या बालनाट्याचा प्रयोग होणार आहे.
छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात २९ ला दुपारी १२ ते सायंकाळी साडेसात, या वेळेत या नाटकाचे चार प्रयोग होणार आहेत, अशी माहिती संचालक दिनेश थोरात यांनी दिली. (Albatya Galbatya is an experiment in children drama In Jalgaon At Chhatrapati Sambhaji Raje Theatre Jalgaon News)
मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय
हेही वाचा: Petrol Price News : सर्वसामान्यांना धक्का! 'पेट्रोल स्वस्त होईल अशी अपेक्षा करू नका'
रत्नाकर मतकरी लिखित व चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित या नाटकाने रंगभूमीवर अनेक विक्रम स्थापित केले असून, एखाद्या शहरात या नाटकाचे एकाच दिवशी चार प्रयोग आयोजित करण्याची जळगावकरांना प्रथमच संधी लाभली आहे.
नाटकाच्या प्रवेशिकांचे प्रकाशन जळगाव पीपल्स बँकेचे चेअरमन अनिकेत पाटील, भालचंद्र पाटील, दिनेश थोरात, नीलेश शेटे, डॉ. दीपक पाटील, जयेश पाटील, गोविंद खांदे यांच्या हस्ते करण्यात आले.
हेही वाचा: SPORTS News : ‘खेलो इंडिया गेम’ मध्ये संस्कृती करणार राज्याचे प्रतिनिधित्व