

Nashik Crime : होलाराम कॉलनीमध्ये सात वर्षांपासून एकत्र राहणाऱ्या प्रियकराने रागाच्या भरात त्याच्या प्रेयसीच्या पाठीत चाकू भोसकून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
भांडण आणि त्यानंतर मुलास मारल्याच्या कारणातून सदर प्रकार घडल्याचे समोर आले आहे. दरम्यान, प्रारंभी याप्रकरणी आकस्मात मृत्यू झाल्याची नोंद होती.
परंतु शवविच्छेदनातून मृत्यू नैसर्गिक नसून खून असल्याचे स्पष्ट झाले. श्याम अशोक पवार (३२, रा. कस्तुरबानगर, होलाराम कॉलनी, नाशिक), असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. (Murder of girlfriend by stabbing autopsy reveals truth Suspect arrested Nashik Crime)
आरती श्याम पवार (२९, रा. कस्तुरबानगर, होलाराम कॉलनी, नाशिक) असे मयत प्रेयसीचे नाव आहे. दिनेश शिवाजी पवार (रा. ठाणे) यांनी याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, पहिल्या पतीने आरतीला सोडून दिल्यानंतर तिची हमाली काम करणाऱ्या श्याम पवार याच्याशी ओळख झाली. त्यातून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण होऊन सात वर्षांपासून ते एकत्र राहत होते.
आरतीला पहिल्या पतीपासून दोन मुली, तर श्यामपासून एक मुलगा व मुलगी आहे. काही कामानिमित्त आरती नंदेकडे गेली होती. तिकडून परत आल्यानंतर, संशयित श्याम व आरती यांच्यात मंगळवारी (ता. १५) सायंकाळी वाद झाला.
मुलाने त्याने पिण्यासाठी पाणी सांगितले असता, त्याने नकार दिला. म्हणून संशयित श्याम पवार याने त्याला मारहाण केली. त्या वेळी आरतीने रोखत श्यामला मारहाण केली. त्यामुळे संतापाच्या भरात श्याम याने घरातील चाकूने आरतीला पाठीमागून भोसकले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
घाव वर्मी बसल्याने ती जागीच कोसळली. बेशुद्ध पडल्याने तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी प्रारंभी सरकारवाडा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
जिल्हा रुग्णालय शवविच्छेदन कक्षात डॉ. श्रावण गायकवाड यांनी मृत आरतीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता, तिच्या पाठीत चाकूसदृश्य हत्याराने खोलवर भोसकल्याचे समोर आले.
चाकू पाठीतून घुसून तिच्या यकृताला इजा पोचली होती. त्यामुळे शरीरांतर्गत मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. तसेच, तिला श्वासही घेत न आल्याने तिचा मृत्यू झाल्याचा निर्वाळा शवविच्छेदनातून दिला.
त्यानंतर सरकारवाडा पोलिसांनी संशयित श्याम पवार यास अटक केल्यानंतर त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. गुन्ह्याचा तपास सहायक निरीक्षक विलास भोये हे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.