Nashik Crime News : दागिण्यांसाठी शेतकरी महिलेचा खून करणारा जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

Nashik Crime News : दागिण्यांसाठी शेतकरी महिलेचा खून करणारा जेरबंद

नाशिक : मुखेड (ता. येवला) येथील नवीन कॅनॉल रोडलगत शेतामध्ये एकटी महिला काम करीत असल्याची संधी साधून संशयिताने तिचा खून केला आणि तिच्या अंगावरील दागिने काढून पोबारा केला.

या खुनाचा नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने उकल करीत संशयिताला जेरबंद केले आहे. निलेश भगवान गिते(३४, रा. महालखेडा, ता. येवला) असे संशयिताचे नाव असून तो सराईत गुन्हेगार आहे. (Murderer of farmer woman for jewellery suspect jailed Nashik Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या शनिवारी (ता. २१) सायंकाळी सदरील खुनाची घटना घडली होती. मुखेड येथील नवीन कॅनॉल लगतच्या शेतात सुरेखा बाळासाहेब आहेर (४०, रा. मुखेड, ता. येवला) या शेतीचे काम करीत होत्या.

त्यावेळी संशयित गिते याने सुरेखा यांना ऊसाचे शेतात ओढून नेत उपरण्याने गळा आवळला व डोके जमिनीवर आपटून खून केला. त्यांच्या अंगावरील 40 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लुटून नेले होते.

याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी घटनास्थळी भेट देत, गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मालेगावचे अपर अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय अधिकारी प्रदीपकुमार जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, येवला तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल भवारी यांना सूचना केल्या.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

हेही वाचा: Jalgaon Crime News : रेल्वे प्रवाशाला गुंगीचे औषध देउन 1 लाख लांबविले

स्थानिक गुन्हेशाखेने घटनास्थळी मिळून आलेले भौतिक पुरावे आणि प्रत्यक्षदर्शीने बघितलेल्या संशयिताच्या वर्णनानुसार निलेश गितेला ताब्यात घेतले. पोलीसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

सदरचा तपास सहायक उपनिरीक्षक रविंद्र वानखेडे, हवालदार नवनाथ सानप, जालिंदर खराटे, पोलिस नाईक विश्वनाथ काकड, नवनाथ वाघमोडे, उदय पाठक, प्रशांत पाटील, नंदू काळे, सागर काकड, प्रितम लोखंडे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, बापू खांडेकर यांनी केला.

हेही वाचा: Cyber Crime | बनावट मेसेजना बळी पडू नका, सायबर भामट्यांपासून सावध राहा : विजय सिंघल