ही बातमी पान ३ वर आवश्यक....
मुरलीधर अभिमान सराफ
सुवर्ण पेढीत ग्राहकांची गर्दी
सकाळ वृत्तसेवा
पाचोरा, ता. ७ ः येथील मे. मुरलीधर अभिमान सराफ ॲन्ड सन्स (पिंपळगावकर) सुवर्ण पेढीच्या नव्या शोरूमचा दुसरा वर्धापनदिन उत्साहात साजरा होऊन तिसऱ्या वर्षात पदार्पण झाले. यानिमित्ताने ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी होत आहे.
या सुवर्ण पेढीच्या नव्या शोरूमच्या दुसऱ्या वर्धापनदिनाला ग्राहक मोठ्या संख्येने भेट देत आहेत. पेढीचे ज्येष्ठ संचालक रवींद्र सराफ, मयूर सराफ यांच्यासह कुटुंबीयांना भरभरून शुभेच्छा ग्राहकांनी दिल्या. उत्तम दर्जाचे दागिने, अप्रतिम व्हरायटी आणि आपुलकीची सेवा तसेच ग्राहकहिताच्या योजनांचे सातत्याने आयोजन यामुळे या पेढीला शहरासह पंचक्रोशीत विशेष स्थान प्राप्त झाले आहे. पेढीच्या या आजपर्यंतच्या प्रवासात ग्राहकांचा विश्वास हीच शिदोरी आहे आणि त्यांच्या प्रती पेढी कायम कृतज्ञ राहील. छोट्यातल्या छोटा ग्राहकही समाधानी होऊन जावा हेच उद्दिष्ट असल्याने ग्राहकांना अधिकाधिक चांगली सेवा कशी देता येईल याला प्राधान्य यापुढेही राहील, असा विश्वास रवींद्र सराफ यांनी दिला. दसरा, दिवाळी या सणांनिमित्त ग्राहकांसाठी काही विशेष नियोजन करीत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या सोन्याचे भाव स्थिरावले आहेत. त्यामुळे दिवसभर दागिने खरेदीसाठी पेढीवर ग्राहकांची वर्दळ दिसून आली.
-------------------------