Muslim Marathi Sahitya Sammelan : नाशिकमध्ये 22 वर्षानंतर मुस्लिम मराठी साहित्य संमेलन

Muslim Marathi Sahitya Sanskrutik mandal
Muslim Marathi Sahitya Sanskrutik mandalesakal

"२८ आणि २९ जानेवारी २०२३ ला नाशिकमध्ये ९ वे अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलन होत आहे. बरोबर २२ वर्षापूर्वी नाशिक शहरात सहाव्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. मुस्लिम मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक, विचारवंत प्रा. फक्रुद्दीन बेन्नूर आणि ज्यांनी महाराष्ट्रात सकल हा शब्द रूढ केला ते लेखक आणि विचारवंत विलास सोनवणे हे दोघेही जग सोडून गेले. परंतु प्रागतिक चळवळीचा वारसा ते सोपवून गेल्यामुळेच या संमेलनाचे आयोजन शक्य झाले आहे. मुस्लिम मराठी साहित्याची चळवळ अधिक व्यापक करण्याचा हेतू या संमेलनाच्या आयोजनाच्या मागे असल्यामुळेच संमेलनात होणारी चर्चा महत्त्वाची ठरणार आहे." -विक्रम गायकवाड, (येवला, जि.नाशिक) gvikram१५५gaikwad@gmail.com

(Muslim Marathi Sahitya Sammelan after 22 years in Nashik news)

महाराष्ट्रात दलित साहित्याची चळवळ उभी राहिली आणि त्याला मान्यता मिळाली असे म्हणणे योग्य नाही, तर ती मान्यता प्रस्थापितांना द्यावी लागली त्यात नाशिककरांचा वाटा मोठा आहे. कथा आणि कादंबरीकार बाबूराव बागूल, शाहीर वामनदादा कर्डक, कवी अरुण काळे यांच्यासह अनेक लेखक आणि कवींनी दलित साहित्य निर्मितीत योगदान दिले आहे.

त्यानंतर आदिवासी साहित्य चळवळ पुढे घेऊन जाण्याकरिता ६ वे अखिल भारतीय आदिवासी साहित्य संमेलनाचे आयोजनही १९९८ मध्ये नाशिकमध्ये केले होते. तत्पूर्वी १९८७ मध्ये दलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. त्या काळात ग्रामीण साहित्याची चळवळ आकार घेऊ लागली होती.

विशेष म्हणजे ग्रामीण साहित्याच्या चळवळीत अनेक अभ्यासकांनी, विचारवंतांनी विशेष परिश्रम घेतले. त्या विषयाकडे त्यांनी चळवळ म्हणून बघितले, नवोदित लेखक लिहिते केले. त्यामुळे ग्रामीण जीवनातील शोषण, वेदना, दुःख साहित्यात दिसू लागले. त्यातूनच शेतकऱ्यांच्या चळवळीलादेखील ताकद मिळाली.

तसाच प्रयत्न आदिवासी साहित्यातदेखील झाला आहे. वाहरू सोनवणे, भुजंग मेश्राम, नजूबाई गावित, बाबाराव मडावी अशी अनेक नावे घेता येतील. वेदनेच्या बीजावर उगवलेल्या साहित्य चळवळीच्या महावृक्षाने प्रस्थापित साहित्य क्षेत्र व्यापून टाकले. त्या जाणीवा घेऊनच मुस्लिम मराठी साहित्य चळवळीचा जन्म झाला.

Muslim Marathi Sahitya Sanskrutik mandal
Nandurbar News : तळोद्यात धावत्या बसचे चाक पंक्चर; जॅक नादुरुस्त अन् वाहकाची दमछाक!

अर्थात त्यामुळेच या चळवळीचे जन्मदाते डॉ. प्रा. फक्रुद्दीन बेन्नूर यांचा दीर्घ सहवास मिळाला आणि त्यांच्यामुळे त्यांच्या इतरही सहकाऱ्यांचाही सहवास मिळाला. मुस्लिम मराठीची संकल्पना मला भावली. त्यामुळेच आम्ही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत नाशिकमध्ये संमेलन घेऊ शकलो.

मुस्लीम मराठी साहित्य चळवळीचा महत्त्वाचा समारंभ असलेले हे संमेलन साहित्याची केवळ ॲकॅडमिक चर्चा करण्याचे व्यासपीठ नव्हे ते मुस्लिम समाजाची संवेदना मांडणारी चळवळ आहे, ही भूमिका प्रा. बेन्नूर आणि विलास सोनावणे आग्रहाने मांडत. त्यामुळे २०२२ मध्ये होणाऱ्या या संमेलनात होणारी चर्चादेखील महत्त्वाची ठरणार आहे.

इतिहास नेहमीच जेत्यांचा असतो असे असले तरी ईस्ट इंडिया कंपनीने इतिहास लिहून घेतला तो त्यांच्या हिताचा. हिंदू- मुस्लीम द्वेषावर आधारित प्रसंगाचे ग्लोरिफिकेशन केले आणि त्याच प्रभावाखाली भारतीय पाठ्यपुस्तके, कथा कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. त्यातून होत जाणाऱ्या हिंदू- मुस्लीम द्वेषपेरणीचा परिणाम भारताची फाळणी आणि नंतरच्या काळात दंगलीमध्ये झाला.

त्यामुळेच मुस्लिम समाजाची भूमिका भारतीय स्वातंत्र्यलढ्यात काय होती, हे समाजासमोर आणणे आवश्यक होते. ही महत्त्वाची जबाबदारी डॉ. अलीम वकील यांनी पार पडली. त्यांनी बंगाली लेखक सांतीमोय रे यांच्या ‘फ्रीडम मूव्हमेंट अॅन्ड इंडियन मुस्लिम’ या पुस्तकाचे मराठीत भाषांतर केले आणि ‘स्वातंत्र्यलढा आणि भारतीय मुस्लीम’ हे अभ्यासपूर्ण पुस्तक प्रकाशित केले.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

Muslim Marathi Sahitya Sanskrutik mandal
Nashik News : बाॅश कंपनीची याचिका फेटाळली

ईस्ट इंडिया कंपनीधार्जिण्या आणि १८५७ नंतर ब्रिटिश सरकारधार्जिण्या इतिहासकारांनी फोडा आणि झोडा या ब्रिटिश राजकारणाला बळ मिळेल असाच इतिहास मांडला. त्यातून मुस्लीम द्वेषाचे राजकारण पुढे नेले.

प्रामुख्याने त्याचा प्रभाव क्रमिक पुस्तकांवरदेखील झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रशासन, लोकशासन, त्यांनी स्वराज्याकरिता वापरलेले स्थापत्य शास्त्र, कृषी उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांच्या मानसिकतेचा केलेला विचार. आदर्श राज्याची नव्याने

मांडलेली संकल्पना याकडे ब्रिटिशधार्जिण्या इतिहासकारांनी दुर्लक्ष करून केवळ मुस्लिम सत्तेविरुद्धचा मनोरंजक संघर्ष मांडून विद्वेषाचे राजकारण केले. त्यानंतर काही लेखकांनी छ. शिवाजी महाराजांचे वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला पण तो तोकडा पडला असेच म्हणावे लागेल. या पार्श्वभूमीवर १९८५ मध्ये आलेले डॉ. अलीम वकील यांचे पुस्तक महत्त्वाचे ठरते.

जातिव्यवस्थेच्या जाचक कायद्यांना झुगारण्याची प्रेरणा सुफी संतांनी दिली. पण तेव्हाही ज्या जाती उत्पादन व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका पार पाडीत होत्या आणि त्या एवढा मोठा निर्णय घेण्यासाठी सक्षम होत्या त्यांनी तेव्हा इस्लाम स्वीकारला.

परंतु, भारतीय समाज व्यवस्थेचा भाग म्हणून आणि उत्पादन व्यवस्थेचा भाग म्हणून त्या कित्येक वर्षे तशाच राहिल्या आणि आहेत. मुस्लिम समाजात याला बिरादरी म्हटले जाते. हेच वास्तव मंडल आयोगाच्या अंमलबजावणीकरता उभारलेल्या चळवळीतून समोर आले. त्यामुळेच मुस्लिम हे बाहेरून आलेले नाही तर याच समाज व्यवस्थेचा एक भाग आहे हे सिद्ध करता आले.

जातीय दंगली आणि हिंदू- मुस्लिम द्वेषाच्या राजकारणाला हे सडेतोड उत्तर होते. आज मात्र ब्रिटिशधार्जिण्या इतिहासावर चर्चा होते आहे. महाराष्ट्रातील ओबीसी मुस्लीम जातींची ओळख, दर्गे, सुफी संतांचा प्रभाव, उरुस, मोहरम यात हिंदू- मुस्लिम समाजाचा सहभाग असतो.

प्रामुख्याने सांगली सातारा आणि कोकणात मराठी भाषेवरून मुस्लीम ओळखणे कठीण आहे. असे आले तरी मुस्लिम आजच्या परिस्थितीत मराठी मुस्लिम म्हणून जगताना जे भोगावे लागते त्या वेदनेचे नाते दलित आदिवासी ग्रामीण साहित्यातून आलेल्या वेदनेशी घट्ट असल्यामुळे अशी साहित्य संमेलने होणे अत्यंत महत्त्वाचे आहे

Muslim Marathi Sahitya Sanskrutik mandal
JEE Mains Exam : रसायन, भौतिकशास्‍त्रच्‍या प्रश्‍नांनी फोडला घाम!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com