MVP Election | मविप्र साठी 300 एकर जमिनीची खरेदी : नीलिमाताई पवार

Nilimatai Pawar latest marathi news
Nilimatai Pawar latest marathi newsesakal

चांदोरी (जि. नाशिक) : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेला सातत्याने विकासाकडे नेण्याचा प्रयत्न विद्यमान कार्यकारी मंडळाने केला आहे. गेल्या बारा वर्षात संस्थेच्या विविध शैक्षणिक प्रकल्पांसाठी तीनशे एकर जमिनीची खरेदी करण्यात आली.

संस्था, सभासद व कर्मचाऱ्यांच्या हिताचे विविध प्रकल्प राबविले. त्यामुळे आगामी काळात मविप्र संस्थेच्या लौकिकात भर घालण्यासाठी सभासदांनी पुन्हा एकदा पाठिंबा देऊन प्रगती पॅनेलला कामाची संधी द्यावी, असे प्रतिपादन संस्थेच्या सरचिटणीस, प्रगती पॅनेलच्या प्रमुख नीलिमाताई पवार यांनी केले. (MVP Election Purchase of 300 acres of land for MVP statement by Neelima Tai Pawar Nashik Latest marathi news)

मविप्र संस्थेच्या निवडणूक प्रचारासाठी आज (ता.९) चांदोरी येथे मेळावा झाला. त्याला मोठ्या संख्येने संस्थेचे सभासद उपस्थित होते. यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी सभापती माणिकराव बोरस्ते, संचालक हेमंत वाजे, दत्तात्रय पाटील, प्रल्हाद गडाख, प्रतापराव मोगल, रामदास शिंदे, देवराम निकम, दत्ताकाका गडाख, अनिल वनारसे, बबन टर्ले, देविदास नाठे, राजेंद्र निरगुडे, शिवाजी टर्ले,नारायण सावंत, संतू खेलूकर, खंडू टर्ले, उत्तम गडाख, विष्णू डेर्ले, डॉ. आत्माराम कुंभार्डे, जगन नाठे, साहेबराव खालकर, सुरेश कळमकर आदी उपस्थित होते.

यावेळी श्रीमती पवार म्हणाल्या, विद्यमान कार्यकारिणीच्या कारकिर्दीत संस्थेत १३७ नव्या शाखा सुरु केल्या. ३०० एकर जमीन खरेदी केली. संस्थेची २९४ कोटींची बांधकामे पूर्णत्वास आली आहेत. १०० कोटींची कामे सध्या सुरु आहेत. तीन हजार ७०० सेवकांना विनाअनुदानित मधून अनुदानित सेवेत वर्ग करण्यात आले.

Nilimatai Pawar latest marathi news
दुगारवाडी घटना : आई-पत्नीच्या डोळ्यांदेखत ‘त्याला’ जलसमाधी

मविप्र संस्था हे भावी पिढी घडविण्याचे केंद्र आहे. शिस्त व मेहनतीमुळे संस्थेचा नावलौकिक वाढत आहे. कोविड काळात जिल्ह्यातील रुग्णांसाठी मविप्रच्या डॉ वसंतराव पवार रुग्णालयाचे दरवाजे कायम खुले होते. ऑक्सिजनअभावी एकही रुग्ण दगावलेला नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले. काही संस्थाबाह्य शक्तींचा निवडणुकीत सहभाग वाढत आहे. संस्थेच्या हितासाठी सभासदांनी प्रगती पॅनेलला साथ द्यावी.

सभापती माणिकराव बोरस्ते यांनी नाशिक जिल्ह्याच्या शिक्षण विकासात मविप्र संस्थेची भूमिका अत्यंत मोलाची आहे. संस्थेने कोरोना काळात पूर्ण क्षमतेने ऑनलाइन शिक्षण तसेच आरोग्यसेवा पुरविली. गेल्या पाच वर्षाच्या काळात संस्थेने जिल्हाभर मोठ्या वास्तू उभारून प्रगतीचा आलेख उंचावला आहे. त्यामुळे विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळी न पडता प्रगती पॅनेलला सभासदांनी पाठबळ द्यावे, असे सांगितले.

दिलीप मोरे म्हणाले, निफाड व मविप्र संस्थेचे नाते आपुलकीचे आहे. तालुक्यातील कर्मवीर गणपतदादा मोरे, कर्मवीर काकासाहेब वाघ, दुलाजीनाना पाटील, डॉ वसंतराव पवार, दगूनाना मोरे, एन. जी. पाटील यांनी संस्थेसाठी मोठे कार्य केले.

डॉ वसंतराव पवार यांनी कायम संस्था व समाजहित जोपासले आहे.तालुक्यात महाविद्यालयीन व इंग्रजी माध्यमाचे शिक्षण सर्वदूर पोहोचले. गेले संस्था दिवसेंदिवस प्रगती करीत आहे. चिटणीस डॉ सुनील ढिकले, दत्ताकाका गडाख यांनी स्वागत केले. संचालक प्रल्हाद गडाख यांनी प्रास्ताविक केले.

Nilimatai Pawar latest marathi news
MVP Election : रिंगणात आजपासून ‘हाय व्होल्‍टेज ड्रामा’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com