Nitin Thakre
sakal
नाशिक: मविप्र विद्यापीठ स्थापन प्रस्तावाबाबत काही जण राजकारणासाठी सभासदांमध्ये गैरसमज पसरवत असून, त्यांच्या आक्षेपांत काहीही तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी दिले. इतर शाखांना धक्का न लावता विद्यापीठ स्थापन करण्याचा प्रस्ताव असून, अंतिम निर्णय हा वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांच्या मंजुरीनेच घेतला जाणार असल्याचे ते म्हणाले.