Sunil Dhikale
sakal
नाशिक: “गेल्या तीन वर्षांत कुठल्याही निर्णयाला विरोध केलेला नाही. मात्र संस्थेच्या व सभासदांच्या हिताला बाधा पोहोचेल, असे वाटल्यास विरोधाशिवाय पर्याय नाही. राजकारण म्हणून नव्हे, तर संस्थेच्या हितासाठी विद्यापीठ स्थापन करण्याच्या प्रस्तावाला विरोध करीत आहे,” अशी स्पष्ट भूमिका मविप्रचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले यांनी मांडली.