Onion Payments
sakal
नाशिक: कांदा विकून तब्बल पाच महिने उलटले तरी एक रुपयाही पदरात न पडल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी (ता.५) शहरातील ‘नाफेड’च्या कार्यालयावर जोरदार मोर्चा काढत थेट टाळे ठोकले. जिल्ह्यातील सुमारे अडीच हजार शेतकऱ्यांचे सव्वाशे कोटी रुपयांहून अधिक पैसे अद्यापही नाफेडकडेच अडकले असून, वारंवार मागणी करूनही पदरी निराशाच येत असल्याने अखेर शेतकऱ्यांचा संयम सुटला.