NAFED Onion Purchase : यंदा नाफेड कांदा खरेदी निकष पाळून पारदर्शक होण्यासाठी प्रयत्न

राज्यात शेतकरी उत्पादक कंपन्या व सहकारी संस्था करणार खरेदी
Onion purchase NAFED nashik
Onion purchase NAFED nashikesakal

NAFED Onion Purchase : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित परतावा मिळत नसल्याने नाफेड खरेदीवर सातत्याने टीका होते. मात्र यंदा मात्र या पार्श्वभूमीवर कांदा खरेदीमधील गैरप्रकार नियंत्रित करण्यासह पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न नाफेड करून करण्यात येत आहे.

त्यानुसार निकष पाळून खरेदी करणाऱ्या व चांगले रिकव्हरी देणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या महासंघांना काम दिले जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. (NAFED Onion Purchase Efforts to be transparent by following NAFED onion purchase criteria this year nashik news)

केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या वतीने भाव स्थिरीकरण योजनेंतर्गत राज्यात मागील वर्षी २०२२ मध्ये रुपये ३५१ कोटी रकमेचा २ लाख ३८ हजार १९६ टन रब्बी उन्हाळ कांदा खरेदी करण्यात आला होता.

नाफेडच्या माध्यमातून उन्हाळ कांद्याची खरेदी करण्यात आली होती. हे कामकाज उपखरेदीदार म्हणून राज्यातील १७ ते १८ शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या महासंघामार्फत पार पडले होते.

यंदा ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या वतीने कांदा खरेदीचा लक्षांक वाढवण्यात आला आहे. नाफेड व एनसीसीएफ यांच्या माध्यमातून तीन लाख टन कांदा खरेदी केला जाणार आहे. ही खरेदी प्रामुख्याने महाराष्ट्रासह गुजरात व मध्यप्रदेश राज्यातील कांदा उत्पादक पट्ट्यात होणार आहे.

त्यामध्ये सर्वाधिक खरेदी ही महाराष्ट्रातून होणार आहे.

गत वर्षातील अनुभव पाहता खरेदीत पारदर्शकता आणण्यासाठी यापूर्वी निकष पाळून काम केलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या महासंघाची निवड करण्यात येणार आहे. मागील वर्षी दिलेली रिकव्हरी व खरेदीतील पारदर्शकता या बाबींचा विचार करून खरेदी कामकाज दिले जाणार आहे.

याशिवाय खरेदीपश्चात ठरलेल्या नियमअटीनुसार वेळोवेळी साठवणूक दरम्यान तपासणी करण्यात येणार आहे. संनियंत्रण होत असल्याने कांदा खरेदी काटेकोर पद्धतीने कामकाज होण्याची चिन्हे आहेत.

मात्र मात्र मागील वर्षाचा पूर्वानुभव पाहता नाफेडने आपली भूमिका कठोर केल्याने यंदा गैरप्रकाराला आळा बसेल व खरेदी पारदर्शकता येईल अशी चिन्हे आहेत.त्यानुसार खरेदी, साठवणूक व पुरवठा अशा कामांवर लक्ष दिले जाणार आहे.

कांदा खरेदीपूर्व होणार शेतकऱ्यांची नोंदणी

मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी नाफेड कांदा खरेदी लांबणीवर गेली आहे; मात्र ही खरेदी लवकरात लवकर होईल अशी माहिती मिळत आहे. ही कांदा खरेदी होण्यापूर्वी शेतकऱ्यांची नोंदणी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या महासंघामार्फत होणार आहे.

यासाठी ऑनलाइन पोर्टलची निर्मिती केली जाणार आहे. त्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्यांना खरेदीपूर्व नोंदणी, खरेदी, साठवणूक व पुरवठा यासंबंधी नोंदणी करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल असेही नाफेडच्या कार्यालयाच्या सूत्राने सांगितले.

निकष पळून होणार असल्याने शेतकऱ्यांना दरातही दिलासा मिळेल असे बोलले जात आहे. राज्यात सहकारी संस्थांना किमान ३ हजार क्विंटल तर शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या महासंघाना ८ ते १६ हजार क्विंटल खरेदी लक्षांक दिल्याची माहिती आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Onion purchase NAFED nashik
Nashik News : शहरात या तारखेपासुन प्रतिबंधात्मक आदेश लागू

मात्र मात्र मागील वर्षाचा पूर्वानुभव पाहता नाफेडने आपली भूमिका कठोर केल्याने यंदा गैरप्रकाराला आळा बसेल व खरेदी पारदर्शकता येईल अशी चिन्हे आहेत.त्यानुसार खरेदी, साठवणूक व पुरवठा अशा कामांवर लक्ष दिले जाणार आहे.

कांदा खरेदीपूर्व होणार शेतकऱ्यांची नोंदणी

मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी नाफेड कांदा खरेदी लांबणीवर गेली आहे; मात्र ही खरेदी लवकरात लवकर होईल अशी माहिती मिळत आहे. ही कांदा खरेदी होण्यापूर्वी शेतकऱ्यांची नोंदणी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या महासंघामार्फत होणार आहे.

यासाठी ऑनलाइन पोर्टलची निर्मिती केली जाणार आहे. त्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्यांना खरेदीपूर्व नोंदणी, खरेदी, साठवणूक व पुरवठा यासंबंधी नोंदणी करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल असेही नाफेडच्या कार्यालयाच्या सूत्राने सांगितले.

निकष पळून होणार असल्याने शेतकऱ्यांना दरातही दिलासा मिळेल असे बोलले जात आहे. राज्यात सहकारी संस्थांना किमान ३ हजार क्विंटल तर शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या महासंघाना ८ ते १६ हजार क्विंटल खरेदी लक्षांक दिल्याची माहिती आहे.

Onion purchase NAFED nashik
Inspiration Story : पोती गठण कारागीर ते तीनमजली ज्वेलर्स शोरूमची मालकीण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com