Inspiration Story : पोती गठण कारागीर ते तीनमजली ज्वेलर्स शोरूमची मालकीण

Chayatai Vadanere- Baviskar
Chayatai Vadanere- Baviskaresakal

Nashik News : कष्ट आणि प्रामाणिक प्रयत्न असले तर आयुष्यात काहीही अशक्य नसते, या सकारात्मक विचारांवर तिने आयुष्याचं जणू समीकरणच ठरवून ठेवलं. संकटं कितीही आली तरी आयुष्यात त्यावर नक्कीच मात करता येते, अशी जणू तिनं मनाशी खूणगाठच बांधून ठेवली.

परिस्थितीमुळे गाव सुटलं... मात्र कष्टमय आयुष्यात यशाची वाट भक्कम करत नाशिकच्या सिडको येथील पहिल्या महिला ज्वेलर्स दुकानाच्या मालकीण म्हणून ओळख उभी केली.

आयुष्यातील प्रतिकूल परिस्थितीशी लढताना नाशिकमध्ये तुटपुंज्या मजुरीवर पोती गाठत सुरवात करत तीनमजली ज्वेलर्स शोरूमच्या मालकीण बनलेल्या छायाताई वडनेरे- बाविस्कर यांचा प्रवास इतरांसाठी जगण्याची प्रेरणा देणारा ठरलाय..! (Inspiration Story Poti Gathan craftsman to owner of a three storey jewelers showroom Nashik News)

छायाताई रमेश वडनेरे... शिक्षण दहावी नापास... माहेर मनमाड येथील, तर सासर नांदगावजवळच्या वेहेळगाव येथील. वडील विठ्ठल रामा बाविस्कर यांचे पत्नी सरस्वती आणि तीन मुले, तीन मुली असं खटल्याचं कुटुंब होतं.

बाविस्कर परिवार मुळातच शेती करणारा... मात्र तुटपुंज्या शेतीमुळे कष्टाशिवाय पर्याय नव्हता. बाविस्कर परिवाराला इतर ठिकाणी कामाला जावेच लागले. बाविस्कर परिवारात छायाताई ज्येष्ठ कन्या असल्याने त्यांच्यावरही ही जबाबदारी बालपणीच येऊन पडली.

आठवीत असतानाच त्यांना मनमाड येथील भंडारी ज्वेलर्सकडून पोती गाठण्याचे काम शिकून घेत एक रुपया प्रतिपोत गाठण्याचं घरगुती काम मिळालं. मात्र हाच एक रुपया लाखमोलाचा आधार त्यांच्या कुटुंबासाठी बनला होता. छायाताई मुळातच अभ्यासात हुशार होत्या. छायाताई नववीत असतानाच वडिलांचं आजारपणात अकाली निधन झालं.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Chayatai Vadanere- Baviskar
Farmer News : शेतकऱ्यांच्या अडचणीत भर; बियाण्यांच्या दरात २५६ रुपयांनी वाढ

घरातील कर्त्या पुरुषाची जबाबदारी छायाताई यांनी सांभाळली. कुटुंबाची जबाबदारी पुढे नेत असतानाच सहा महिन्यांच्या अंतराने त्यांच्या आजीचंही निधन झालं.

बाविस्कर कुटुंबातील तीन मुलींच्या विवाहाची जबाबदारी कमी करताना आईसोबत भावकीने छायाताई यांचा विवाह नातेसंबंधातील असलेल्या वेहेळगाव येथील रमेश वडनेरे यांच्याशी लावून दिला.

Chayatai Vadanere- Baviskar
Nashik Rain Update : जिल्ह्याच्या काही भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज

जबाबदारीचं ओझं

पती रमेश वडनेरे यांचंही शिक्षण दहावीपर्यंतच. दुष्काळी परिस्थितीमुळे पती रमेश यांनी थेट नाशिक गाठत पडेल ती कामे करत कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न केला. सुरवातीला रमेश यांनी औद्योगिक वसाहतीतील अनेक कंपन्यांमध्ये सिक्युरिटी गार्डचे काम केले. मात्र त्यात जम बसला नाही.

याच काळात नाशिकमध्ये डाय प्रेस ऑपरेटर म्हणून डिझाइन टिकली तयार करण्याचे काम स्वीकारले. कुटुंबाला हातभार लावताना छायाताई या ब्लाऊजसाठी काच-बटण करण्याचे घरगुती काम करत होत्या. मुलगी अश्विनी आणि मुलगा अक्षय यांच्यानिमित्ताने कुटुंबातील सदस्यसंख्याही वाढली.

पती रमेश यांना मदत म्हणून छायाताई याही चांदीची टिकली तयार करण्याचे काम शिकल्या. वडनेरे कुटुंबातील कोणीही सराफी व्यवसायात नसतानाही दांपत्याने या व्यवसायात स्वतःला झोकून दिले. मनमाडमध्ये पोती गाठण्याचे काम शिकलेल्या छायाताई यांना हा अनुभव नाशिकमध्ये मात्र कामी आला.

त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना थेट सायकलीवर पिंपळगाव, सिन्नर, दिंडोरी यांसह नाशिकच्या विविध भागात पती रमेश विक्रीसाठी जात होते. येथूनच खऱ्या अर्थाने वडनेरे कुटुंबाला यशाची वाट सापडली. याच काळात छायाताई यांच्या परिवाराने भाड्याने गाळा घेत दुकान थाटले.

Chayatai Vadanere- Baviskar
Nashik News: डासांच्या उच्छादाने सिन्नरकर हैराण! सिन्नर- शिर्डी रस्त्यालग्यातील गटारीचे ढापे तुटले

यशाचा वाढता आलेख

जुने सिडको परिसरात अगदी छोट्याशा गाळ्यात सुरू झालेला ज्वेलर्सने आज भव्य तीनमजली अश्विनी ज्वेलर्स या शोरूममध्ये रूपांतर झालंय. कष्टाला प्रामाणिकपणाची जोड देत अश्विनी ज्वेलर्सच्या निमित्ताने ७ कुटुंबांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देतानाच मुलगा अक्षय, सून आर्किटेक्ट रेणुका, जावई उद्योजक अनिमेष दुसाने, मुलगी अश्विनी यांचेही योगदान मोलाचे असल्याचे त्या अभिमानाने सांगतात. छायाताई यांच्या अश्विनी

ज्वेलर्सला पुढे नेण्यासाठी राका सराफ, राजाभाऊ खालपकर, गेईमल सराफ, अरुणराव दाभाडे यांनी दिलेल्या पाठबळामुळेच इथपर्यंतचा यशस्वी प्रवास करू शकलो, हेही सांगायला छायाताई विसरल्या नाहीत.

Chayatai Vadanere- Baviskar
Ranchi News: प्रसिद्ध मॉडेलिंग कंपनी अश्लीलता आणि लव्ह जिहादचा अड्डा! मॉडेलचा गंभीर आरोप..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com