नाशिक: ‘नाफेड’च्या कांदा खरेदी प्रक्रियेत एकीकडे अनियमितता आढळत असतानाच दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे अटल नावीन्यपूर्ण सहकारी संस्था जी सध्या अवसायनात आहे, तिच्याकडून सर्रासपणे कांदा खरेदी सुरू असल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) फयाज मुलाणी यांनी ‘नाफेड’ला नोटीस बजावत, तातडीने कांदा खरेदी थांबविण्याचे निर्देश दिले आहेत.