नाशिक: नागपंचमी साजरी करताना सापांप्रति श्रद्धा व्यक्त केली जाते. मात्र, सणानिमित्त सापाला घाबरून किंवा तो दिसल्यास त्याच्यावर हल्ला करत त्याचा जीव घेण्याचे प्रकार अनेकदा ऐकावयास येतात. सापांबद्दल असलेले गैरसमज दूर करून नागरिकांमध्ये जागृती करत सापांचे महत्त्व अधोरेखित करण्याची गरज आहे. नागपंचमीच्या निमित्ताने सर्पांविषयी असलेले अंधश्रद्धेचे अज्ञान दूर करून सर्पसंवर्धनासाठी जागरूकता वाढवण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.