Matoba Maharaj Temple
sakal
निफाड: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि नैताळेकरांचे अराध्य दैवत श्री मतोबा महाराज मंदिरातून तब्बल तीन किलो चांदीच्या दोन मूर्ती व दानपेटीची मध्यरात्री चोरी झाली. ही घटना बुधवारी (ता. ३) पहाटे उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप उसळला असून, चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई होईपर्यंत नैताळे गाव स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.