death
sakal
नामपूर: बागलाण तालुक्यात मोसम, काटवन, करंजाडी खोऱ्यात शनिवारी (ता. २७) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास झालेल्या मुसळधार वादळी पावसाने अक्षराशा दाणाफान उडाली. पावसासह वादळाचा तुफान वेगामुळे सिमेंट काँक्रीटच्या घरांच्या भिंती कोसळून गोराणे येथील आदिवासी कुटुंबातील सासरा आणि सून, तर खालचे टेंभे (ता. बागलाण) येथील वयोवृद्ध महिला अशा तीन निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. दरम्यान बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी तालुक्यातील नुकसानग्रस भागाची पाहणी करून तहसीलदार यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.