NAMCO Bank Election: ‘नामको’त सत्ताधारी पॅनलची लागणार कसोटी; सभासदांपर्यंत पोचण्यास करावी लागणार कसरत

NAMCO Bank Election
NAMCO Bank Electionesakal

NAMCO Bank Election: नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत माघारीच्या अंतिम दिवशी विरोधी सहकार पॅनलच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने सत्ताधारी प्रगती पॅनलसाठी निवडणूक एकतर्फी झालेली आहे.

असे असले तरी, प्रचारात सत्ताधाऱ्यांची कसोटी लागेल. विरोधी पॅनल नसले, तरी अपक्ष रिंगणात आहे. त्यामुळे प्रचार यंत्रणा राबवावी लागणार असून, पाच वर्षांचा लेखाजोखा सभासद मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी सत्ताधाऱ्यांना कसरत करावी लागेल. (NAMCO Bank Election Efforts will have to be made to reach members because of independence nashik news)

जिल्ह्यासह परराज्यांत बॅंकेचे कार्यक्षेत्र असल्याने बॅंकेच्या निवडणुकीकडे सहकारबरोबरच राजकीय लोकांचे लक्ष लागून आहे. बॅंकेच्या मतदारांमध्ये मध्य विधानसभा मतदारसंघातील मतदारांचे मोठे प्राबल्य असल्याने या निवडणुकीकडे आगामी विधानसभेची निवडणुकीच्या दृष्टीने पाहिले जात आहे.

त्यादृष्टीने इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू आहे. यात सत्ताधारींकडून विरोधी पॅनलला उमेदवार मिळू नये, अशी व्यूहरचना आखण्यात आली. शह-काटशहाचे राजकारण करणारी ही व्यूहरचना कामाला आली.

माघारीच्या अंतिम दिवशी नाट्यमय घडामोडींनंतर विरोधी सहकार पॅनलचे नेते गजानन शेलार यांसह त्यांच्या प्रमुख उमेदवारांनी निवडणुकीतून अखेरच्या क्षणी माघार घेतली. माघारी झाल्याने सत्ताधाऱ्यांसाठी ही निवडणूक एकतर्फी झाली.

NAMCO Bank Election
NAMCO Bank Election: नामको बॅक निवडणूक हेव्या-दाव्यांकडे! माजी आमदार पितापुत्रांवर पोलिस कर्मचाऱ्याची तक्रार

मात्र, संदीप भवर यांच्यासह पाच अपक्ष रिंगणात राहिल्याने या निवडणुकीला रंगत आली. पॅनल नसले, तरी अपक्ष उमेदवार असल्याने सत्ताधारी प्रगती पॅनलला प्रचार यंत्रणा राबवावी लागणार आहे.

जिल्ह्यासह परराज्यांत बॅंकेचे तब्बल एक लाख ८८ हजार सभासद आहेत. मतदानासाठी तब्बल ३४८ मतदान केंद्रे आहेत. या सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्याकरिता सत्ताधारी पॅनलच्या उमेदवारांना कसरत करावी लागेल. त्यासाठी प्रचारसभा घेऊन कार्यकर्त्यांना ‘चार्ज’ करावे लागणार आहे.

चिन्हांचे झाले वाटप

माघारीनंतर निवडणूक अधिकारी फयाज मुलानी यांनी उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले. यात सत्ताधारी प्रगती पॅनलच्या उमेदवारांना जीप चिन्ह मिळाले. संदीप भवर यांना विमान, विजय बोरा यांना पाकीट, महेंद्र गांगुर्डे यांना छत्री, सुधाकर जाधव यांना कपबशी, संजय नेरकर यांना मोरपीस, कपिलदेव शर्मा यांना तुळशी वृंदावन चिन्ह देण्यात आले आहे.

NAMCO Bank Election
NAMCO Bank Election: ‘नामको’बॅंक निवडणुकीत अपक्षांमुळे रंगत! 19 जागांसाठी 26 उमेदवार रिंगणात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com