NAMCO Bank Election: नामको बॅक निवडणूक हेव्या-दाव्यांकडे! माजी आमदार पितापुत्रांवर पोलिस कर्मचाऱ्याची तक्रार

NAMCO Bank Election
NAMCO Bank Electionesakal

NAMCO Bank Election: नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणूक सहकाराची असली तरी, त्यामागे विधानसभेचा छुपा अजेंडा असल्याचे लपून राहिलेले नाही. त्यामुळे आरोप-प्रत्योरापांवर असलेली ही निवडणूक आता ही अगदी हेव्यादाव्यांवर येऊन ठेपली आहे.

पॅनेल नेतृत्व करत असलेल्या माजी आमदार व त्यांच्या पुत्रांविरोधात एका कर्मचा-यांने पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. या तक्रारींवरून दोन गटात हेवे दावे झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे निवडणुकीत हा वाद टोकाला जाण्याची शक्यता आहे.

जिल्हयासह परराज्यात बॅंकेचे कार्यक्षेत्र असल्याने बॅंकेच्या निवडणुकीकडे सहकारसोबतच राजकीय लोकांचे लक्ष लागून असते. (NAMCO Bank Election Police officer complaint against former MLA father and son nashik news)

मतदारांमध्ये मध्य विधानसभा मतदारसंघातील मतदारांचे मोठे प्राबल्य असल्याने, विधानसभेची निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्व दिले जात आहे. त्यासाठी सत्ताधारी पॅनेलचे नेतृत्व करत असलेले माजी आमदार आणि विद्यमान आमदार प्रयत्न करत आहे.

पडद्यामागे यासाठी कट-शहाचे राजकारण सुरू होते. मात्र, आता ते समोर येऊ लागले आहे. बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष तथा माजी आमदार व त्यांचे पुत्र माजी उपमहापौर यांच्या विरोधात एका कर्मचा-यांने उसनवार घेतलेले पैसे देत नसल्याची तक्रार पोलिसात करत या विरोधात उपोषण करण्यासाठी पत्र दिले आहे. या प्रकारामुळे दोन गटात बाचाबाची झाल्याचे बोलले जात आहे.

बिनविरोध निवडणुकीचे अफवा

निवडणुकीत दिवसेंदिवस नाट्यमय घडामोडी होत असतानाच, शुक्रवारी थेट निवडणूक बिनविरोध होत असल्याची अफवा व्हायरल झाल्याने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली. पारंपारिक प्रतिस्पर्धी पॅनलचे प्रमुख गजानन शेलार यांनी सत्ताधारी प्रगती पॅनलकडे पाच जागांवर हक्क सांगितला आहे.

NAMCO Bank Election
NAMCO Bank Election: नामकोच्या निवडणुकीत भाजपने घातले लक्ष; स्वतंत्र पॅनेल बनविण्याच्या हालचाली

५ जागा मिळाल्यास सहकार पॅनलचे सर्वच उमेदवार माघार घेत प्रगती पॅनलला पाठिंबा दर्शवू. शेलार यांच्या या मागणीवर सत्ताधारी प्रगती पॅनेलकडून सकारात्मक चर्चा सुरू असून पाच जागा की त्यापेक्षा कमी जागा यावर तडजोड सुरू आहे. एकंदरीत दोन्ही पॅनेलकडून बिनविरोधासाठी प्रयत्न सुरु असल्याची अफवा दिवसभर सुरू होती. दरम्यान, पारंपारिक प्रतिस्पर्धी पॅनेलने मात्र निवडणुकीवर ठाम असल्याचे सांगत अफवांना पूर्णविराम दिला.

माघारीनंतरच पॅनेलची घोषणा

सत्ताधारी पॅनलकडून शनिवारी बैठक घेऊन उमेदवारी निश्चिती करण्यात येणार होती. त्यानंतर रविवारी (ता.10) पत्रकार परिषद घेऊन पॅनेलची घोषणा केली जाणार असल्याचे निरोप देण्यात आले होते. परंतु, सायंकाळी अचानक पत्रकार परिषद रद्द झाल्याचे निरोप आले.

यावर सत्ताधारी पॅनेलने माघारीपूर्वीच पॅनेल घोषित केल्यास विरोधकांकडून उमेदवार पळविण्याचा धोका असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे माघारीनंतर सोमवारी पॅनेलची घोषणा केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे विरोधी पॅनेलने उमेदवार अंतिम झाले असल्याचा दावा केला असून माघारीनंतरच पॅनेल घोषित करण्याची भूमिका घेतली आहे.

NAMCO Bank Election
NAMCO Bank Election: ‘सहकारा’च्या पटलावर राजकारणाचे मोहरे; आजी-माजी आमदारांची कसोटी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com