NAMCO Bank Election: ‘सहकारा’च्या पटलावर राजकारणाचे मोहरे; आजी-माजी आमदारांची कसोटी

NAMCO Bank Election
NAMCO Bank Electionesakal

NAMCO Bank Election: नाशिक मर्चंट मल्टीस्टेट बॅंकेच्या निवडणुकीत बिनविरोधाची शक्यता मावळत असताना आजी-माजी आमदारांचा देखील कस लागणार असल्याचे दिसून येत आहे. मध्य विधानसभा मतदारसंघांशी जवळचा संबंध असलेल्या या निवडणुकीत निवडणूक जिंकून विधानसभेत प्रबळ दावा करायचा आहे.

दुसरीकडे भविष्यातील स्पर्धक म्हणून बॅंकेच्या निवडणुकीतच गारद करण्यासाठी देखील प्रयत्न होताना दिसून येत आहे. त्यामुळे बॅंकेची निवडणूक सर्वपक्षीय मिळून व सहकाराची असली तरी राजकारणाची भली मोठी किनार लाभताना दिसत आहे. (NAMCO Bank Election test of mla and former MLAs nashik news)

नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी बॅक म्हणून ‘नामको’चा उल्लेख होतो. त्यामुळे या बॅंकेच्या निवडणुकीकडे सहकाराबरोबरच राजकीय लोकांचे देखील लक्ष लागून असते. सध्या अर्ज माघारी व पॅनेल बनविण्यासाठी रात्रीचा दिवस होत आहे. पॅनेल बनविण्यापूर्वी बिनविरोधाची शक्यता देखील पडताळून पाहिली जात आहे. मात्र सध्या तरी बिनविरोधाची कुठलीच चिन्हे दिसतं नाही. बिनविरोध निवडणूक होऊ नये असा देखील एक प्रयत्न होताना दिसत आहे.

निवडणूक बॅंकेची असली तरी त्यामागे विधानसभा निवडणुकीचा छुपा अजेंडा आहे. नामको बॅक व्यापाऱ्यांची समजली जाते. बहुतांश सदस्य मध्य विधानसभा मतदारसंघांशी जोडलेले आहे. त्यामुळे या बॅंकेत निवडून आल्यास विधानसभेचा मार्ग मोकळा होईल किंवा ताकद वाढणार आहे. परंतु आगामी निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून इच्छुकांची ताकद वाढणे विद्यमान आमदारांना देखील चालणार नसल्याने सहकाराच्या पटलावर राजकारणाचे मोहरे हलविण्याचे उद्योग सुरु झाल्याचे बोलले जात आहे.

दहा संचालकांविरोधात याचिका

बँकेच्या निवडणुकीत विद्यमान संचालक सोहनलाल भंडारी याच्यासह दहा संचालकांविरोधात उमेदवार संदीप भवर यांनी घेतलेल्या हरकती निवडणूक अधिकारी फयाज मुलानी यांनी फेटाळल्यानंतर भवर यांनी शुक्रवारी (ता. ८) उच्च न्यायालयात धाव घेत या विरोधात याचिका दाखल केली. यावर माघारीच्या अंतिम दिवशी म्हणजे सोमवारी (ता.११) सुनावणी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे गत निवडणुकीतील अनुभव पाहता विद्यमान संचालक मंडळाने जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालयात यापूर्वीच कॅव्हेट दाखल केलेले आहे.

NAMCO Bank Election
NAMCO Bank Election: बिनविरोध निवडणुकीची शक्यता मावळली! 21 जागांसाठी विक्रमी 272 उमेदवारी अर्ज दाखल

शुक्रवारी १४ जणांची माघार

शुक्रवारी माघारीच्या तिसऱ्या दिवशी १४ जणांनी माघार घेतली असून आतापर्यंत माघारीचा आकडा २५ वर पोहचला आहे. त्यामुळे आता निवडणूक रिंगणात २१ जागांसाठी १४७ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहे.शुक्रवारी माघार घेतलेल्या उमेदवारांमध्ये भाजप नेते तथा सत्ताधारी पॅनेलचे नेते अजिंक्य साने यांच्यासह भगवान सानप, हर्षद दाढीवाल, सचिन गीते, मयूर गीते, सचिन कोठावदे, नितीन पवार, ललित नहार, शंकर वाघ, संजय सानप, विजय सदाफळ, प्रशांत सोनजे, पद्मा बूब, श्यामलाल मोहेकर यांचा समावेश आहे.

यापूर्वीच्या बारा संचालकांकडून सुमारे साडे तीन कोटी

रुपये वसुल करण्याचे आदेश असल्याने सोहनलाल भंडारी, वसंत गिते, विजय साने, कांतिलाल जैन अविनाश गोठी, शोभा छाजेड यांच्यासह बारा संचालकांचे अर्ज अवैध ठरवावे अशी हरकत उमेदवार भवर यांनी घेतली. सोमवारी या हरकतींवर रात्री उशिरापर्यंत युक्तिवाद झाला. यात, हरकती फेटाळत सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरविले. २०१८ च्या पंचवार्षिक निवडणुकी दरम्यान भवर यांनी याच मुद्यावर न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे हा अनुभव लक्षात घेऊन सत्ताधारी संचालक मंडळातर्फे मंगळवारीच जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केलेले आहे. अखेर शुक्रवारी भवर यांनी या विरोधात याचिका दाखल केली.

सत्ताधारी गटाची आज बैठक

सत्ताधारी गटाने यंदा काही संचालकांना डच्चू देऊन नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची भूमिका घेतली आहे. मात्र, सत्ताधारी पॅनेलकडे इच्छुकांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. पॅनेल नेतृत्वाकडून इच्छुकांची मनधरणी केली जात आहे. याउलट अनेकांकडून उमेदवारांसाठी दबाव टाकला जात आहे. यातच डच्चू देणा-यांकडूनही दबावतंत्राचा वापर केला जात असल्याने पॅनेल नेतृत्व कोंडीत सापडले आहे. यासाठी सत्ताधारी गटाकडून शनिवारी (ता.९) बैठकीची शक्यता आहे.

NAMCO Bank Election
NAMCO Bank Election: नामकोच्या निवडणुकीत भाजपने घातले लक्ष; स्वतंत्र पॅनेल बनविण्याच्या हालचाली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com