Elderly Woman
sakal
नामपूर: अहवा-छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गालगत येथील शिवमनगर परिसरात कंटेनर आणि स्कुटीच्या धडकेत वयोवृद्ध महिला जागीच ठार झाली. रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. जायखेडा पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून कंटेनर चालक फरारी असल्याचे पोलिसांनी सांगितले.