Namo Shetkari Mahasamman Yojana
esakal
तळवाडे दिगर (नाशिक) : अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्नवाढीसाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या (Namo Shetkari Mahasamman Yojana) धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये तीन समान हप्त्यात थेट बँक खात्या जमा होतात. योजनेचा आठवा हप्ता जाम न झाल्यामुळे शेतकरी चौकशीसाठी, बँका, बँक मित्र, सेतू कार्यालय, कृषी कार्यालयात चकरा मारत आहेत.