Namokar Teerth : देशाच्या आर्थिक विकासात जैन समाजाचा वाटा मोठा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

Namokar Teerth Hosts International Panchkalyanak Mahotsav : चांदवड येथील मालसाने येथे आयोजित ‘णमोकार तीर्थ’ महोत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी जैन मुनींचे आशीर्वाद घेतले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
Namokar Teerth

Namokar Teerth

sakal 

Updated on

नाशिक/गणूर: सध्या आपण कोणतीही गोष्ट ‘जीडीपी’मध्ये मोजतो म्हणून सांगावेसे वाटते, की देशाच्या आर्थिक विकासात जैन समाजाचा वाटा मोठा आहे. देशाच्या एकूण विकासातही जैन समाजाचे मोठे योगदान आहे. केवळ सर्वांत जास्त सेवाकार्यच नाही, तर दानधर्म करण्यातही जैन बांधव नेहमीच पुढे राहतात. त्यांनी अंगीकारलेले धर्माचे विचारच देशाला दिशा दाखवू शकतात. णमोकार ही भूमी केवळ धार्मिक स्थळ नसून, येणाऱ्या अनेक शतकांना योग्य मार्ग दाखविणारी आध्यात्मिक भूमी ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com