CA Success Story
sakal
नामपूर: दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (आयसीएआय) यांनी सप्टेंबरमध्ये घेतलेल्या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला असून सीए अंतिम परीक्षेत नामपूर येथील रहिवासी गेल्या काही वर्षांपासून पुण्यात स्थायिक झालेले मयूर सावंत आणि मृणाल सावंत या सख्ख्या भावडांनी एकाचवेळी सीएच्या परीक्षेत सोनेरी यश संपादन केले. दोन्ही मुलं सीए झाल्याची बातमी कळल्यानंतर आई वडिलांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.