agricultural crisis
sakal
नामपूर: जिल्ह्यातील परतीच्या पावसामुळे मका, कांदा, भाजीपाला व फळबागांसह शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र राज्य शासनाने नुकसानभरपाईसाठी फार्मर आयडी अनिवार्य केल्याने दोन लाख १० हजार १०८ शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांना मदतीसाठी फार्मर आयडीची अट शिथिल करावी, अशी मागणी बळीराजा आत्मसन्मान फाउंडेशनने केली आहे.