Jagdish Deore
sakal
नामपूर: सततची नापिकी, अवकाळी पावसाने झालेले नुकसान, वाढते कर्ज आणि कांद्याला मिळत असलेल्या अत्यल्प भावामुळे आलेल्या आर्थिक विवंचनेला कंटाळून सारदे (ता. बागलाण) येथील तरुण शेतकरी जगदीश भास्कर देवरे (वय ३५) यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. बुधवारी (ता. ५) सकाळी ही घटना उघडकीस आल्याने परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.