नांदूर मधमेश्वर ला विविध सोसायटीच्या ( शताब्दी वर्षापूर्ती ) सर्वसाधारण सभा

नांदूर मधमेश्वर ला विविध सोसायटीच्या ( शताब्दी वर्षापूर्ती ) सर्वसाधारण सभा
Published on: 
NDM26B01312 नांदूरमध्यमेश्वर ः येथील सोसायटीच्या शताब्दी वर्षानिमित्त गौरविण्यात आलेले गावातील विविध मान्यवर. ------------- ३६-४ नांदूरमध्यमेश्वर सोसायटीतर्फे गुणवंतांचा सत्कार -------------- शतकपूर्तीनिमित्त विविध परीक्षेत यश, विविध पदांवर निवड, नियुक्तीबद्दल २१ जणांचा गौरव ---------------- नांदुरमध्यमेश्वर, ता२ ः शतक पूर्ण करणाऱ्या येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विविध परीक्षेत यश, विविध पदांवर निवड, नियुक्तीबद्दल २१ जणांचा गौरव करण्यात आला. या आगळ्यावेगळ्या सत्काराने सारेच भारावून गेले. --------------- येथील सोसायटीची स्थापना १९२६ मध्ये झाली आहे. यावर्षी संस्थेची शताब्दी वर्षपूर्ती आहे. संस्थेची सर्वसाधारण सभा प्रथम महिला अध्यक्षा शीलाबाई शेळके यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सतीश शिंदे यांनी सूचना मांडल्यानंतर ज्ञानेश्वर अनारसे यांनी अनुमोदन दिले. विविध दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. गावातील विविध पदावर यश संपादन केलेल्या सर्वांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. सभेच्या विषय पत्रिकेनुसार चर्चा करण्यात आली. सभासदांनी सर्व विषयांना मंजुरी दिली. अध्यक्षा शेळके, उपाध्यक्ष संदीप उबाळे, भाऊसाहेब भवर, माणिक इकडे, रामदास शिंदे, किरण उबाळे, भारत कहाने, नामदेव शिंदे, गोरक्ष शिंदे, दादा मामा पगारे, इंदूबाई शिंदे, दीपक इल्ले, पुंडलिक आढाव, एकनाथ नाईकवाडे, शिवाजी घोडेकर, शिवाजी वाघ, प्रकाश गोसावी, तसेच शिवाजी पगारे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष रंगनाथ अनारसे, शरद शिंदे, अंबादास इकडे, शशिकांत शिंदे, भाऊसाहेब शिंदे, पंढरीनाथ गाजरे, नामदेव शेळके, संस्थेचे सचिव जगताप यांच्यासह कर्मचारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. ------------ २०-२ चौकट प्रमुख सत्कारार्थी असे स्वाती कर्डिले (प्राथमिक शिक्षक), पूजा शिंदे ( प्राथमिक शिक्षक), प्रियंका कहाणे (माध्यमिक शिक्षक), परवेझ अत्तर (प्राथमिक शिक्षक), अश्विनी जाधव (वैद्य) (कर सहाय्यक), अंजली पगारे (महाराष्ट्र पोलिस), पूजा जाधव (मुंबई पोलिस), विकास पवार (पोलिस चालक), जयश्री डांगले (नागपूर पोलिस), तन्मय इकडे (एमटेक पदवी), सार्थक सूर्यवंशी (गृह मंत्रालय भारत सरकार), संस्कृती सूर्यवंशी (मायक्रोन कंपनी), शिवम अनारसे (आसाम रायफल), सुजित अनारसे (फूड टेक्नॉलॉजी, दिल्ली), डॉ. ऋषिकेश धुमाळ (डॉक्टर), गायत्री शिंदे (बारावीत प्रथम), अनुजा डांगले (दहावीत प्रथम), दिगंबर पवार (हेडक्लार्क ३६ वर्ष सेवा), प्रकाश वाघ (क्लार्क, ३६ वर्ष सेवा), (कै) शंकर तात्याबा गुरव ( हेडक्लार्क ३१ वर्ष सेवा), कैलास तात्याबा पुजारी ( ३४ वर्षे सेवा, शिपाई) ------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com