Dahegav Dam
sakal
नांदगाव: तालुक्यातील अनेक लहान मोठे धरणे ओसंडून वाहत असताना शहराला पाणीपुरवठा करणारे दहेगाव धरण रिकामे असताना त्यात झालेली वाढ काही अंशी दिलासा देणारी आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दहेगाव धरणाच्या जलाशयाच्या पातळीत तीस टक्के एवढा संचय झाला आहे. त्यामुळे जलसाठा दोन तीन महिन्यासाठी हातभार लावण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.