नांदगाव- शाळा प्रवेशोत्सवाचा सोहळा उत्साहात पार पाडणाऱ्या नांदगाव तालुक्यात शिक्षण विभागाची आता कागदावरच्या लक्ष्यांक पूर्तीसाठी मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी त्रेधातिरपीट उडत आहे. एकीकडे अशी धावपळ सुरूच आहे. रिक्त पदांसाठीचा अनुशेष भरून निघण्याऐवजी गेल्या १२ वर्षांपासून शिक्षण विभागाचा कार्यभार तात्पुरता पदभार सोपवून तालुक्यातील प्राथमिक शिक्षणाची वाटचाल सुरू आहे.