esakal | नांदगाव पूर : साकोरातील 14 हजार कोंबड्या मृत अवस्थेत; पॉल्ट्री शेडमध्ये शिरले पाणी
sakal

बोलून बातमी शोधा

sakora

नांदगाव पूर : साकोरातील 14000 कोंबड्या मृत अवस्थेत

sakal_logo
By
भगवान हिरे

नांदगाव (जि.नाशिक) : नांदगाव येथील लेंडी नदी परिसरातील सर्व घरे वाहून गेल्याने घरांची मोठ्या प्रमाणात हानी झाली. अनेक ठिकाणी महिला आक्रोश करताना दिसल्या. गेल्या दोन दिवसांपासून सुरु सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूर पाण्यात आपले दुकान वाहून गेल्याने आपली व्यथा 'सकाळ'कडे मांडताना दिसले. काल पासून सुरू असलेला पाऊस (ता.७) मध्यरात्रीपर्यंत अखंडपणे सुरू होता. परिणामी लेंडी व शाकांबरी नदी पात्राला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. साकोरा येथील पॉल्ट्री शेडमध्ये पाणी शिरल्याने 14000 हजार कोंबड्या असलेल्या १० हजार कोंबड्या मेल्या व साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. लेंडी नदीवरील सबवे ते रेल्वे स्थानकापर्यंत भुसावळ मुंबई लोहमार्गावर पाणीच पाणी झाले. रेल्वे स्थानकावर पाणी पोहचण्याची ही पहिलीच वेळ आहे. लोहशिंगवे वालूर व मोरझर या क्षेत्रात प्रचंड मुसळधार राशी पर्जन्यवृष्टी सुरू असल्याने लेंडी व शाकंबरी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला. दहेगाव नाका गुलजारवाडी भागातील नागरिकांची घरे पाण्याखाली येवून दोन फुटाएवढे पाणी या भागातील घरात घुसले.

loading image
go to top