Sunil Sonawane
sakal
नाशिक: गिरणानगर (ता. नांदगाव) ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचार अहवालावर ठोस कारवाई न करता कर्तव्यात कसूर केल्याचा गंभीर आरोप करीत ग्रामपंचायत सदस्य सुनील सोनवणे यांनी थेट मुंबई येथे जाऊन आंदोलन छेडले. प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात उभारलेल्या या सत्याग्रहामुळे ग्रामविकास यंत्रणेची कार्यपद्धती पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर सचिवांशी चर्चा झाल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.