Nandgaon Monsoon
sakal
नांदगाव: शहर व परिसरात शनिवारी (ता. २७) विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची त्रेधा उडाली, तर शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. गटारी मोकळ्या नसल्याने शहरातील रस्ते जलमय झाले, तर वीजपुरवठा खंडित झाल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले.