Nandgaon Monsoon
sakal
नांदगाव: परतीच्या पावसाने नांदगाव शहर व ग्रामीण भागाला अक्षरशः झोडपून काढले. शनिवारी (ता. २७) सायंकाळी पाचपासून सुरू झालेला मुसळधार पाऊस रविवारी (ता. २८) सकाळी दहापर्यंत अखंडपणे धो धो बरसला. शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला खरीप वाया गेल्यात जमा असून, पाचही महसूल मंडलांत नव्वद मिलिमीटरहून अधिक पावसाची विक्रमी नोंद झाली.