नांदगाव- येथील ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या आदिवासी गर्भवती महिलेला दिवसभर ताटकळत ठेवून तिची प्रकृती गंभीर झाल्यावर आता तुझी प्रसूती नॉर्मल होणार नाही असे सांगून सिझेरियनसाठी दुसऱ्या दवाखान्याचा जाण्याचा सल्ला देणाऱ्या मद्यधुंद डॉक्टर व अन्य कर्मचाऱ्यांना शिवसैनिकांनी चोप दिला.