Nashik: नांदगाव, मनमाडचे सेतू केंद्र ठप्प! दलालांचा वावर संपणार कधी? नागरिकांसह विद्यार्थ्यांचे दाखल्यांसाठी हाल

Nampur Tehsil Office
Nampur Tehsil Officeesakal

नांदगाव येथील तहसील कार्यालयातील सेतू केंद्र बंद असून तीस सप्टेंबरला करार संपल्याने शासनाने फोर्थ एन्टरप्रायजेसला हे काम सोपविले.

शिल्लक व प्रलंबित कामकाज करण्यासाठी जुन्या मक्तेदाराला पंधरा दिवसाची मुदतवाढ देण्यात आल्याने पंधरा ऑक्टोबरपर्यच हे काम करण्याची मुभा जुन्या मक्तेदाराला दिली गेली.

सेतूचे काम मिळण्यासाठी टेरा सॉफ्टवेअर लि., दिलीप इलेक्ट्रिकला अँड कॉन्ट्रॅक्टर व फोर्थ डायर्मेशन सोल्युशन्स लि. या तीन खासगी मक्तेदारांनी निविदा भरल्या होत्या.

तिघांच्याही सारख्याच दराच्या निघाल्यामुळे जिल्ह्यातील पंधरा तालुक्यातील काम पुढीलप्रमाणे वाटून देण्यात आले आहे.

सध्या नांदगाव तालुक्यात अडीचशेवर महा- ई सेवा केंद्रे असल्याने तहसीलच्या सेतू कार्यालयात फक्त दलालांचा वावर असतो. अशा दलालांना अजूनही म्हणावा तसा पायबंद बसलेला नाही.

नांदगाव- मनमाड : नांदगाव तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र चालविण्याकामी देण्यात आलेली ठेक्याची मुदत संपली असल्याने नांदगावसह मनमाड येथील सेतू सेवा बंद आहे. सदर कामकाज अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आल्याने अनेकांचे दाखल्याची कामे खोळंबली आहे.

मनमाड येथील सेतू बंद असल्याने त्याचा आर्थिक फटका आणि मानसिक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे तातडीने सेवा सुरू करण्याची मागणी केली जात आहे. (Nandgaon Manmad setu office blocked When will brokers end Students along with citizens in trouble for certificates Nashik)

तहसील कार्यालयामार्फत शासनाच्या विविध योजनांसाठी, विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशासाठी व सवलतीसाठी लागणारे दाखले दिले जातात. त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता व कार्यालयीन प्रक्रिया शासनाच्या सेतू सुविधा केंद्रामार्फत संबंधितांकडून पूर्ण करून घेतली जाते.

नांदगाव तहसील कार्यालयात असलेल्या सेतू सुविधा केंद्र चालविण्याकामी देण्यात आलेली ठेक्याची मुदत संपली आहे. त्यामुळे हे काम तहसील कार्यालयातील अधिकारिवर्गांकडे वर्ग करण्यात आले आहे.

हे काम अधिकाऱ्यांकडे देण्यात आल्याने पूर्वीचे काम हे जादाचे काम यामुळे त्यांच्यावर कामाचा भार वाढला आहे. कामे खोळंबली जात आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना वेळेत दाखले मिळत नसल्याचा आरोप लाभार्थी करत आहे.

मनमाड येथील सेतू सुविधा केंद्र बंद असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अनेक लाभार्थींचे दाखले, प्रमाणपत्रे रखडली आहेत.

मनमाड येथून नांदगाव येथे जावे लागत आहे. तर अधिकारी वर्ग काम करत नसल्याने त्यांना अनेक चकरा मारूनही दाखले मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत तहसील कार्यालयात चौकशीसाठी गेलेल्या नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे देऊन परत पाठविले जाते.

Nampur Tehsil Office
Nashik News: चणकापूर शंभर टक्के भरले! मालेगाव शहरास 52 गावांचा पाणीप्रश्‍न सुसह्य

ही प्रक्रिया कधी सुरू होईल, याबाबत माहिती नसल्याने, अनेक लाभार्थींना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

अनेकांची कामे रखडली आहेत. लाभार्थ्यांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे तात्काळ सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

"तहसील कार्यालयाशी संलग्नित सेतू सेवा बंद असल्याने नागरिकांची कामे होत नाही. अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. दाखल्यांसाठी नांदगाव येथे चकरा माराव्या लागतात. परंतु तेथेही सेतू सेवा बंद असून तो पदभार अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. अधिकारी वर्ग लवकर कामे करत नसल्याने अनेक दाखल्याची कामे खोळंबली आहे. प्रशासनाने लवकरात लवकर सेतू सेवा केंद्र सुरू करून नागरिकांना होणारा त्रास टाळावा."- विलास कटारे, समाजसेवक

"सेतू चालवण्याच्या ठेक्याची मुदत संपल्यामुळे नांदगावसह मनमाड येथील सेतू सेवा बंद आहे. जोपर्यंत ठेक्याबाबत काही निर्णय होत नाही तोपर्यंत सेवा देणे बंद असणार आहे. परंतु दाखल्यांचे व इतर कामे घेऊन येणारे नागरिक मोठ्या प्रमाणात चकरा मारत असून त्यांनी नांदगाव तहसील कार्यालयात जावे. सेतू सेवा लवकरात लवकर सुरू होईल अशी आशा आहे."

- सुहास क्षीरसागर, केंद्र चालक, मनमाड

Nampur Tehsil Office
Nashik News: नामपूर बाजार समिती निवडणूक विश्लेषण; सत्ताधाऱ्यांचे विमान क्रॅश, मनमानीला लागला ब्रेक!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com