Municipal Election
sakal
नांदगाव: राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार बुधवारी (ता. ८) सकाळी अकराला पालिकेच्या सभागृहात मालेगावचे प्रांताधिकारी नितीन सदगीर व मुख्याधिकारी श्यामकांत जाधव यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत झाली. यात एससी महिला (अनुसूचित जाती), एसटी महिला (अनुसूचित जमाती), ओबीसी महिला (नागरिकांचा मागास प्रवर्ग) आणि सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण चिठ्या काढण्यात आल्या.