सातपूर परिसरात राहणाऱ्या परप्रांतीय व्यक्तीची अवघ्या चार वर्षांची कन्या नंदिनी अचानक बेपत्ता झाली होती. घरात तीन मुली आणि एका मुलाच्या पाठीवर झाल्याने ती सर्वांची लाडकी होती. तिचा पिता दररोज सातपूर पोलिस ठाण्यात अनवाणी पायांनी यायचा आणि ‘सापडली का माझी नंदिनी..?’ एवढंच विचारायचा. तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोज कारंजे यांनी नंदिनीचा शोध लावत तिला कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.