Nandur Madhyameshwar
sakal
चांदोरी: नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य पुन्हा एकदा पक्षीप्रेमींसाठी पर्वणी ठरले आहे. वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने उद्घाटन सोहळ्यात झालेल्या पक्षी प्रगणनेत तब्बल ११ हजार १७६ पक्ष्यांची नोंद झाली. या प्रगणनेतून अभयारण्यातील जैवविविधतेची संपन्नता अधोरेखित झाली आहे. चापडगाव, मांजरगाव, खानगावथडी, नांदूरमध्यमेश्वर गोदावरी नदीपात्र, कोठुरे, कुरुडगाव आणि काथरगाव अशा सात ठिकाणी निरीक्षण करून ९ हजार २५३ पाणपक्षी तर १ हजार ९२३ स्थलांतरित व गवताळ भागातील पक्षी पाहायला मिळाले.