Rahul Dhotre : नाशिक हाणामारीतील मृत राहुल धोत्रेच्या कुटुंबीयांचा आक्रमक पवित्रा; आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

Family’s Demand for Arrest and MCOCA Action : सर्व संशयित आरोपींना मकोका लावा, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही व इथून आम्ही उठणारही नाही, असा आक्रमक पवित्रा नांदूर नाका येथील धोत्रे कुटुंबीयांनी घेतला.
protest
protestsakal
Updated on

नाशिक: भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांच्यासह इतर आरोपींना अटक करा, तपास अधिकारी तत्काळ बदला, सर्व संशयित आरोपींना मकोका लावा, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही व इथून आम्ही उठणारही नाही, असा आक्रमक पवित्रा नांदूर नाका येथील धोत्रे कुटुंबीयांनी घेतला. रात्री उशिरापर्यंत २०० हून अधिक नागरिक, धोत्रे कुटुंब व वडार समाज संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन कक्षाजवळ ठाण मांडून होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com