Nanduri Saptashrunggad road
sakal
वणी: नांदुरी ते सप्तशृंगगड या घाटरस्त्याचे काँक्रिटीकरण व घाट संरक्षक भिंतीचे काम मेपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे रखडले आहे. अपूर्णावस्थेतील रस्ता आणि जुन्या रस्त्याची झालेली दुरवस्था यामुळे आगामी नवरात्रोत्सवात वाहतूक विस्कळित होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, ती सुरळीत राखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस प्रशासन व राज्य परिवहन महामंडळाला विशेष उपाययोजना कराव्या लागणार आहेत.