Raosaheb Kasabe
sakal
नाशिक: कविवर्य नारायण सुर्वे यांच्या कवितेतून वाचकांच्या जाणिवा बदलल्या. कविता कशी असते, ती कशी करावी आणि कशी समजून घ्यावी, त्यांच्याकडून शिकायला मिळाले. त्यामुळेच साहित्य निर्मितीतून माणसाच्या विचार करण्याच्या कक्षा विस्तारायला हव्यात, तरच त्याला साहित्य म्हणता येईल; अन्यथा साहित्य वाचल्यानंतर माणसाच्या विचारांची क्षमता वाढत नसेल, तर त्याला ‘साहित्य’ म्हणता येत नाही, असे स्पष्ट विचार ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी मांडले.