Property Expo
sakal
नाशिक: ‘नरेडको’तर्फे आयोजित ‘होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो-२०२५’ या गृह प्रदर्शनास चार दिवसांत तब्बल ४० ते ४५ हजारांहून अधिक नागरिकांनी भेट दिली. त्यामुळे ‘नरेडको’ आता ४० हजारांवर वृक्ष लागवड करणार आहे. या प्रदर्शनात ३१२ जणांनी आपले गृह खरेदीचे स्वप्न पूर्ण केले. घर बुकिंग करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला ‘नरेडको’तर्फे १० ग्रॅम चांदीचे नाणे भेट देण्यात आल्याची माहिती मुख्य समन्वयक जयेश ठक्कर आणि सचिव शंतनू देशपांडे यांनी दिली.