नाशिक- राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांनी आदिवासी आयुक्तालयासमोरील बिऱ्हाड आंदोलकांची भेट घेत त्यांचा प्रश्न बुधवारी (ता. २३) मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्याचे आश्वासन दिले. बैठकीत तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे आणि शैक्षणिकदृष्ट्या हे शिक्षक कसे पात्र ठरतात, याचा लेखी प्रस्ताव देण्याचे आवाहन मंत्री झिरवाळ यांनी आंदोलकांना केले. मात्र, सरकार बाह्यस्रोतांद्वारे भरती करण्यावर ठाम असल्याचे त्यांनी आंदोलकांना सांगितले.