नारोशंकराची घंटा : तुमच्‍या मित्रांना कॉल करून बोलवता का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

call

नारोशंकराची घंटा : तुमच्‍या मित्रांना कॉल करून बोलवता का?

शहर परिसरात सामाजिक, सांस्‍कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्‍साहाने आयोजित केले जाऊ लागले आहेत. आयोजकांमध्ये कमालीचा उत्‍साह जाणवत असला तरी प्रेक्षकांनी सभागृह भरेपर्यंत काय धाकधूक होते ते आयोजकच सांगू शकतात. अशाच एका कार्यक्रमात उपस्‍थितांची संख्या व त्‍यावर आयोजकांकडून आलेली उत्‍स्‍फूर्त प्रतिक्रिया विनोदी किस्सा बनली. (naroshankarachi ghanta Do you call and invite your friends nashik news)

राष्ट्रीय पातळीवरील वक्‍ते असलेले काही मान्‍यवर कार्यक्रमात मार्गदर्शनासाठी नाशिकला दाखल झाले होते. उच्च शिक्षित व्‍यावसायिक संघटनेतर्फे हा कार्यक्रम आयोजित केलेला होता. ठरल्‍याप्रमाणे कार्यक्रमाची वेळ झाली पण सभागृहात बोटावर मोजण्याइतकेच डोके दिसत होते.

त्यामुळं वक्‍त्‍यांना हॉटेलमधून कार्यक्रमस्‍थळी बोलायचे की नाही, असा पेच आयोजकांसमोर उभा राहिला. इतक्‍यात कार्यक्रमांच्‍या वार्तांकनासाठी पत्रकार दाखल झाले. सहजच आयोजकांपैकी एकाची गाठ पडल्‍याने उपस्‍थितीबाबतची त्‍यांच्‍या मनातील खदखद जिभेवर आलीच.

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

हेही वाचा: Nandurbar News : ठेकेदाराच्या जप्त डिपॉझिटमधून रस्त्याची दुरुस्ती; बांधकाम विभागाची कामगिरी

'आजकाल लोकं गोळा करणं कठीणचं आहे. एखादं मोफत शिबिर आयोजित केलं असतं तर गर्दी झाली असती. आता कार्यक्रमाची वेळ झालीये. तुमचे मित्र जवळपास असतील तर बोलवता का, तेवढाच हॉल भरलेला वाटेल' अशी इच्‍छा प्रकट करण्यात आली.

वार्तांकनापर्यंत ठिक होतं, पण आता कार्यक्रमासाठी लोकंही गोळा करण्याची वेळ ओढवली असा प्रश्‍न पत्रकारांच्‍या चेहऱ्यावरील हसू आवरू शकला नाही. शेवटी आयोजक अन्‌ पत्रकार दोघांनीही हसत सभागृहाकडे पावले वळविली. अन्‌ जेमतेम लोकांच्‍या उपस्‍थितीत कार्यक्रम पार पडला.

हेही वाचा: Nashik News : दलित वस्तीच्या विकासकामांना 31 कोटींचा निधी!

टॅग्स :Nashik