नारोशंकराची घंटा : शिक्षकांचे प्रयत्न पडले अपुरे...

vollyball court
vollyball courtesakal

नाशिकमध्ये वासननगर येथील उद्यान परिसरात राहणाऱ्या शिक्षकांनी स्वखर्चाने व्हॉलीबॉलचे मैदान विकसित केले आहे. (naroshankarachi ghanta efforts of teachers were insufficient nashik news)

या ठिकाणी प्रकाशझोतासाठी उंच खांबावर एलईडी दिवा बसवला आहे. हा दिवा खाली पडल्याने हा खांब खाली उतरवत शिक्षकांनी दुरुस्तीचे काम सुरू केले. सर्वच शिक्षक असल्याने पर्यायांची आणि मार्गदर्शनाची कमी नव्हती.

तुटलेला एलईडी पुन्हा खांबाला जोडण्यात आला. खांब उभा करताना एका बाजूने झुकू नये म्हणून त्याला दोरी बांधून एकाला खांब कलू लागला, की त्याच्या विरुद्ध बाजूला ओढायचे, अशी जबाबदारी देण्यात आली.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

vollyball court
नारोशंकराची घंटा : अन मॅडम जमिनीवर आल्या...

मोठ्या कष्टाने मग सर्वांनी मिळून खांब कसाबसा उभा केला खरा; मात्र उंचीमुळे तो एका बाजूला झुकला. मात्र दोरी हातात असणाऱ्याने विरुद्ध बाजूला न ओढता त्याच बाजूला ती ओढल्याने व्हायचे तेच झाले. खांब जमिनीवर पुन्हा आडवा झाला. त्याही स्थितीत सर्वांची हसून पुरेवाट झाली. अर्थात दुरुस्तीचा प्रयत्न सोडून देण्यात आला, हे सांगायला नको.

vollyball court
नारोशंकराची घंटा : चर्चा होईल हो, पण सत्कार महत्त्वाचे!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com