food
foodesakal

नारोशंकराची घंटा : संस्कारापेक्षा जेवण महत्त्वाचे...

आजची तरूणाई आणि येणाऱ्या पिढीतही वाचन संस्कृती रूजली पाहिजे, असा टाहो सर्रासपणे फोडला जातो. पण, पालक म्हणून आपणच या विषयाला किती महत्त्व देतो याबाबत आत्मचिंतन करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. नाशिकपासून काही अंतरावर असाच एक पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम झाला. (naroshankarachi ghanta Food more important than Sanskar nashik news)

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

food
नारोशंकराची घंटा : स्पर्धेत अधिकाऱ्यांची दादागिरी...!

या पुस्तकाचा विषय आणि प्रमुख वक्तेदेखील ‘मराठी अस्मिते’चे वलय असलेले. त्यातच, संयोजकांनी कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचेही निमंत्रण दिलेले असल्याने कार्यक्रमाला कौटुंबिक स्नेहमेळाव्याचे स्वरूप आलेले.

अशा कार्यक्रमांत ‘पुढारपण’ करणारेही अनेक जण असतात. असाच एक कथित ‘नेता’ कार्यक्रम संपताच कुटूंबियांसह भोजनाच्या ठिकाणी रांगेत उभा राहिला. आपल्या मागे आणि पुढेही अनेकजण उभे आहेत, याची जाणीवही न ठेवता कुटुंबियांना पोटभर जेवता आले पाहिजे, एवढीच चिंता त्याला सतावत असावी.

त्याचा हा अविर्भाव पाहून एकजण मुद्दाम म्हणाला, ‘बरं झालं तुम्ही मुलांना आणलं. अशा कार्यक्रमांतून खूप काही शिकायला मिळते.’ त्यावर या महाशयाची प्रतिक्रिया अत्यंत बोलकी होती. तो म्हणाला, ‘काही शिकायला किंवा मुलांवर संस्कार म्हणून एवढ्या लांबवर कुणी येतं का? अहो, एवढ्या महागड्या ठिकाणी कुटुंबियांना जेवणासाठी आपण कधी नेतो का?...’ आता बोला!

food
नारोशंकराची घंटा : आहे ग्रॅज्युएट, तरी मतदान येत नाही!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com