नारोशंकरची घंटा : चोराचे अश्रू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

thief

नारोशंकरची घंटा : चोराचे अश्रू

चोराच्या वाटा चोरांनाच माहीत असतात, असे म्हटले जाते खरे; पण, एखाद्या चोरापेक्षा मालक हुशार असेल तर काहीपण घडू शकते. त्याचे झाले असे की, भल्यामोठ्या अन तितक्याच नावाजलेल्या दुकानात एक मुलगा नुकताच कामाला लागला.

लोकांना कपडे दाखवायचे. विस्कटलेले कपडे व्यवस्थितरीत्या ठेवायचे काम त्याच्याकडे आले (Naroshankarachi ghanta Tears of Thief nashik news)

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

जेमतेम चार, दोन दिवस झाले असतील कामाला तर या बहाद्दराने चार ड्रेसवर ‘हात मारला.’ महागडे ड्रेस चोरीला गेले म्हणून मालकही चिंतेत पडला. आता काय करायचे, कुणावर शंका घ्यायची म्हणून त्यांनी थेट सीसीटीव्ही तपासले.

खातेंतर्गत चौकशी करतात तशी, दुकानांतर्गत चौकशी पूर्ण झाली. यात काम करणाऱ्या व्यक्तीने चार ड्रेस चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले. आता या मुलाची काही खैर नाही म्हणून सर्वजण त्याच्याकडे आशाळभूत नजरेने बघू लागले.

मालकाने अजून दोन ड्रेस हातात घेतले आणि थेट चोरी करणाऱ्या मुलाच्या घरी पोहोचला. तुमच्या मुलाने काय पराक्रम केला, हे त्याच्या आई- वडिलांना सांगितले. सोबत आणलेले दोन ड्रेस त्यांच्या हातावर ठेवले आणि यापुढे तुमच्या मुलाला आमच्याकडे कामाला पाठवू नका, अशी कळकळीची विनंती केली. मालकाची ही गांधीगिरी बघून चोराच्याही डोळ्यात अश्रू तरळले. आपण आयुष्यात काय चूक करून बसलो याचा कदाचित पश्चात्ताप त्याला झाला असावा...

टॅग्स :NashikSakalthief