
नाशिक : मध्यवर्ती बस स्थानकाच्या (सीबीएस) नूतनीकरणासाठी शासनाने दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून लवकरच बसस्थानकाचे काम हाती घेतले जाणार आहे. प्रस्तावित कामांमध्ये सीबीएसची जुनी इमारत काढून नवीन इमारत व आगार उभे केले जाणार आहे. ठक्कर बाजार येथील मध्यवर्ती बस स्थानकाला एअरपोर्टचा लुक देऊन फेब्रुवारी महिन्यात या कामाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले. (10 crore fund from Govt for CBS bus stand renovation )
त्यानंतर जुन्या सीबीएस इमारत व आगाराचे नूतनीकरण व पुनर्बांधणीची मागणी होत होती. त्या अनुषंगाने मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी शासनाकडे निधीची मागणी केली होती. त्या अनुषंगाने शासनाने दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून भव्य अशी दोन मजली इमारत उभी राहणार आहे. (latest marathi news)
प्रास्तावित इमारतीत महत्त्वाचे
- दोन मजली भव्य इमारत.
- तळमजल्यावर ९५० चौरस मीटरचे काम.
- पहिल्या मजल्यावर ५९० चौरस मीटरचे काम
- इमारतीत सांडपाणी व्यवस्थापन.
- सीबीएस परिसरातील चार हजार चारशे चौरस मीटर क्षेत्राचे काँक्रिटीकरण.
- पेवर ब्लॉक बसविणार.
- फायर फायटिंगसह रेनवॉटर हार्वेस्टिंग सुविधा.
''अनेक वर्षांपासून सीबीएस इमारत नूतनीकरणाची मागणी होती. त्या अनुषंगाने शासनाने दहा कोटींचा निधी मंजूर केला असून लवकरच भूमिपूजन होणार आहे.''-प्रा. देवयानी फरांदे, आमदार, मध्य विधानसभा मतदारसंघ.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.