Nashik Fraud Crime : सोलर कृषीपंप योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची 10 लाखांची फसवणूक

Fraud Crime : शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध व्हावी व वीज खर्चात बचत व्हावी, यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांसाठी सौर कृषीपंप योजना राबविली जात आहे.
fraud crime
fraud crime esakal

Nashik Fraud Crime : शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध व्हावी व वीज खर्चात बचत व्हावी, यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांसाठी सौर कृषीपंप योजना राबविली जात आहे. सौर पंपाची गरज असूनही शेतकरी लाभापासून वंचित आहेत. अशा शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा उठवत पुणे येथे प्लांट असलेल्या कंपनीची योजनेसाठी नियुक्ती केली आहे, असे भासवून जिल्ह्यातील एका-एका शेतकऱ्याकडून ८० हजार ते दीड लाख रुपयांपर्यंतच्या आगाऊ रकमा धनादेश व रोख स्वरुपात उकळवत दहा लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला. (fraud of farmers in name of solar agriculture pump scheme )

याप्रकरणी शेतकऱ्यांनी कळवण पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज केला असून, पोलिस तपास करीत आहेत. सौर कृषीपंप मिळवून देण्याच्या नावाखाली नाशिक जिल्ह्यातील सटाणा, कळवण, देवळा, नांदगाव, इगतपुरी आदी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून ३ ते १५ एचपी क्षमतेप्रमाणे पैसे घेऊन शेतकऱ्यांना ग्रिनलाईट सोलर, पुणे नावाने नोंदणी, पेमेंट स्वीकारल्याची पावती दिली.

दोन-तीन वर्ष झाले तरी मात्र सौरपंपाचा लाभ मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांनी सौर पंपासाठी भरलेली रक्कम परत द्यावी किंवा सौरपंप बसवून देण्याबाबत ग्रीन लाईट सोलरचे पगार व शिंपी यांच्याकडे तगादा लावल्यावर उलट त्यांनी शेतकऱ्यांनाच धमकावले. त्यामुळे चौकशी करुन सबंधित संशयित आरोपी गौरव मधुकर पगार (देवळा) व मुंबई येथील आकाश अनिल शिंपी (बाविस्कर) यांवच्यार कारवाई करावी, अशी तक्रार कळवण पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे.

fraud crime
Nashik Fraud Crime : खोटा मेसेज दाखवून फसवणुक करणारा संशयित जेरबंद

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश

संशयित दोघांनी मिळून जिल्ह्यातील शेतकऱ्यांची तब्बल दहा ते अकरा लाख रुपयांची सोलर पंप योजनेच्या नावाखाली फसवणूक केल्याचे तक्रारदारांचे म्हणणे असून, या प्रकाराची वरिष्ठ पातळीवरून इतर जिल्ह्यातही सखोल चौकशी झाल्यास मोठा घोटाळा बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबतचा तपास पोलिस निरीक्षक शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बोरसे करीत आहे. फसवणूक झालेल्या सर्व शेतकऱ्यांनी संशयितांना पकडून पैसे परत मिळण्यासह कारवाईची मागणी केली आहे.

''दिवसा पिकांना पाणी देता येईल, वीजबिल वाचेल म्हणून सौर पंपासाठी पैसे भरले. दुष्काळ, बाजारभाव या संकटात असतानाच या फसवणुकीमुळे जास्तच अडचणीत सापडलो आहोत. सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळवून देत गुन्हेगारांवर कारवाई व्हावी.''- खंडेराव निकम, शेतकरी, कळवण

fraud crime
Nashik Fraud Crime: इमारतीचे वाढीव बांधकाम करीत फसवणूक; बिल्डरविरोधात गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com