Nashik News : आरटीईसाठी 10 शाळांची करावी लागेल निवड; एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास ठरणार बाद

Nashik : उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर पालकांना अपेक्षित असणारी आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याने शिक्षण विभाग बॅकफूटवर आला आहे.
RET
RET esakal

Nashik News : उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर पालकांना अपेक्षित असणारी आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याने शिक्षण विभाग बॅकफूटवर आला आहे. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी ३१ मेपर्यंत ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. अर्ज करताना पालकांना दहा शाळांची निवड करावी लागणार असून, एकापेक्षा जास्त अर्ज भरल्याचे आढळल्यास अर्ज सोडतीसाठी विचारात घेतला जाणार नाही. ( 10 schools have to be selected for RTE )

तसेच अर्जात चुकीची माहिती भरल्याचे निदर्शनास आल्यास प्रवेश रद्द केला जाणार आहे. ‘आरटीई’च्या प्रवेश प्रक्रियेबाबतच्या मार्गदर्शक सूचना प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी प्रसिद्ध केल्या. प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे आर्थिक दुर्बल, वंचित, आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास घटकांतील बालकांना स्वयंअर्थसहाय्यित शाळा, विनाअनुदानित शाळा, पोलिस कल्याणकारी शाळा (विनाअनुदानित) आणि महानगरपालिका शाळांमध्ये (स्वयंअर्थसहाय्यित शाळा) पहिली किंवा पूर्वप्राथमिक या स्तरावर २५ टक्के राखावी जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे.

आरटीई प्रवेशासाठी यापूर्वी ऑनलाइन अर्ज केलेल्या विद्यार्थ्याच्या पालकांना पुन्हा नव्याने अर्ज करावा लागणार आहे. आधीच्या अर्जाचा २०२४-२५ या वर्षाच्या आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. आर्थिक वर्षामध्ये पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असलेल्या पालकांच्या बालकांचा आर्थिक दुर्बल गटामध्ये समावेश होतो.

२५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी विचारपूर्वक १० शाळांची निवड करावी. शाळेपासून घरापर्यंतचे हवाई अंतर गुगल मॅपने निश्चित करायचे असल्याने शाळा निवडताना अंतराची बाब लक्षात घेऊन पालकांनी बलूनद्वारे निवासस्थनाचे ठिकाण निश्चित करण्यासाठी तो बलून जास्तीत जास्त पाच वेळाच निश्चित करता येईल. त्यामुळे पालकांनी निवासस्थानाचे स्थान अचूक नमूद करावे. (latest marathi news)

RET
Nashik News : वेगवेगळ्या घटनात दोघांनी उचलला टोकाचा पाउल

अर्ज भरण्याच्या कालावधीमध्ये इंटरनेट अथवा इतर तांत्रिक अडचणीमुळे परिपूर्ण अर्ज सादर करण्यामध्ये व्यत्यय येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शक्य तितक्या लवकर अर्ज सादर करावा. प्रवेश प्रक्रियेबाबत काही समस्या असल्यास आरटीई संकेतस्थळावर मदत केंद्राची माहिती देण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून समस्येचे निराकरण करावे.

आरटीई २५ टक्के अंतर्गत या पूर्वी शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करता येणार नाही. पालकांनी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करू नयेत, असे स्पष्ट करण्यात आले. अधिक माहिती https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

''इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे ग्रामीण भागापासून शहरी भागातील पालकांना आकर्षण आहे. आरटीईमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या पालकांची सलग आठ वर्षे मोफत शिक्षणाची सोय होते. आरटीई जागांसाठी सुमारे तीन/चार महिने विलंब झाला असला तरी शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रियेत केलेला बदल स्वागतार्ह आहे. १५ जूनपूर्वी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावेत.''- संजय अमृतकार, शिक्षणप्रेमी, नामपूर.

RET
Nashik News : पावसाळ्याच्या तोंडावर नाले सफाईला वेग; येवल्यात जेसीबी, पोकलेनच्या सहाय्याने स्वच्छता मोहीम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com